राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्धापनदिन व आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णीफाटा येथील रक्तदान शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्धापनदिन व आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णीफाटा येथील रक्तदान शिबिराचे आयोजन

दौलत हलकर्णी / सी. एल. वृत्तसेवा
         राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्धापनदिन व चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील तुलसीबझारच्या सभागृहात १४ जून २०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            नव्यानेच आमदारपदी विराजमान झालेल्या राजेश पाटील यांनी मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न मार्गी लावले आहेत. आमदार झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस पण कोरोनाच्या पार्श्वभुमिवर इतर कार्यक्रमांना फाटा देत रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तरी जास्ती जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहण तालुका संघाचे सचालक तानाजी गडकरी यांनी केले आहे. सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराला सुरवात होणार आहे.

No comments:

Post a Comment