मारूती यमाजी जाधव |
कोळींद्रे (तालुका आजरा ) गावचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती यमाजी जाधव चुनाभट्टी पोलीस ठाणे , मुंबई यांना त्यांनी केलेल्या पोलास दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान पदक जाहीर झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती जाधव यांनी मुंबई पोलीस दलात 29 वर्षे सेवा केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ मित्तल यांना 1994 साली वीस कोटीच्या खंडणी करीता पळवून नेले होते. त्यातील गुन्हेगारांचा पाटलाग करून दोघांना पकडले होते . यापैकी एका गुन्हेगाराचा एन्काउंटर केला होता. त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा रोख तीन हजार रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले होते. श्री जाधव यांनी आतापर्यंतच्या सेवेमध्ये अनेक खून, दरोडा,बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांच्याकडून 20 रिव्हॉल्वर हस्तगत केल्या आहेत .तसेच साडेचार कोटी पेक्षा जास्त किमतीचे हिरे मोत्याचे , सोन्याचे , चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. त्यांनी केलेल्या तपासामध्ये अनेक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे .1993 च्या मुंबई दंगलीमध्ये श्री जाधव यानी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. आतापर्यंत अंधेरी, डी. एन. नगर, एम आर आर ए मार्ग, एमआयडीसी, सहारा विमानतळ, मानखुर्द, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चुनाभट्टी इत्यादी पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ठ सेवा बजावली आहे. श्री जाधव याना पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी , पत्नी सौ . शोभा , मुली राजश्री, स्वराली , स्वाती , अर्चना यांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment