तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
एकता फौन्डेशन तेऊरवाडी यांच्या वतीने सोमवार दि .१५ जून रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
कोविड - १९ अंतर्गत आरोग्य यंत्रणेला रक्ताची गरज भासल्यास उपयोगात यावे यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे .या अगोदर फौंन्डेशनने संपूर्ण गावची आरोग्य तपासणी करून त्याना अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या वाटल्या आहेत . तसेच कॉरंटाईन केलेल्या सर्वांची थर्मल स्कॅनिंग करण्याचे काम चालू आहे . आताही रक्तदान करून आरोग्य यंत्रणेला फौंन्डेशनचे सर्व युवक सहकार्य करणार असल्याची माहिती अध्यक्ष दयानंद पाटील यानी दिली . या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकानी रक्तदान करण्याचे आवाहन फौंन्डेशनकडून करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment