कॉरंटईन असेलेले तेऊरवाडी येथील युवक शालेय परिसराची स्वच्छता करताना. |
तेऊरवाडी- सीएल वृत्तसेवा
लॉक डाऊन झाल्यानंतर मुंबई , पूणे येथील हजारो चाकरमानी गावाकडे परतू लागले. यातील अनेकांना गावातील शाळामध्ये कॉरंटाईन केले आहे . तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील मराठी विद्यामंदिरमध्ये कॉरंटाईन केलेल्या युवकांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून स्वच्छतेचे मनावर घेतले आणि बघता बघता संपूर्ण शाळा व परिसर चकाचक झाला .
सध्या जवळपास सर्वच शाळामध्ये कॉरंटाईन केलेले चाकरमानी ठेवले आहेत .कॉरंटाईन करण्यावरून ग्रामस्थ ,कोरोना दक्षता समिती व कॉरंटाईन लोक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडले . पाणी , लाईट , जेवण , स्वच्छता यावरूनही अनेकानी ग्रामस्थांशी हूज्जत घातली . अस्वच्छतेसंदर्भात तेऊरवाडी मराठी विद्यामंदिर मधील एक व्हीडीओ व्हायरल झाला होता . याच शाळेत अगोदर कॉरंटाईन केलेल्या काहीजनानी अस्वच्छता केली होती . प्लास्टीक पिशव्या , कचरा डस्ट बिनमध्ये न टाकता इतरत्र तसाच फेकला होता . परिसरात रानही वाढले होते .कचरा करणाऱ्यांचा कॉरंटाईन कालावधी संपला आणि येथे दुसरे युवक कॉरंटाईन होण्यासाठी आले . यामध्ये प्रदिप हेंडोळे, महादेव बुच्चे , कल्लापा पाटील ( सैनिक ) , नारायण पाटील , विश्वनाथ पाटील , भरमू कुंभार यानी येथील अस्वच्छता पाहिली .लगेच या सर्वानी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला .कचरा कोणी कोलाय याकडे बोट न करता तो कसा काढून टाकता येईल याचा विचार केला . बघता बघता १२ हात न थकता कामाला लागले अन संपूर्ण शालेय परिसरच चकाचक झाला. कोणी रान काढले , कोणी कचरा तर काहींनी दगडे व फुटलेल्या फरशा जमा केल्या .अनं पाहता - पाहता संपूर्ण शालेय परिसर स्वच्छ झाला . या अगोदर जानबा पाटील या माजी सैनिकाने माध्यमिक शाळेचा परिसर एकटयानेच स्वच्छ केला होता . स्वच्छतेसंदर्भात ग्रामपंचायत व प्रशासनाशी वाद न घालता स्वतः च स्वतःचे रक्षक म्हणून शालेय परिसर स्वच्छ करणाऱ्या या युवकांचा सर्वानी आदर्श घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment