मास्क वाटप करताना मान्यवर. |
दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय. हलकर्णीच्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हलकर्णी फाटा येथे दुकानदार, कामगार. गॅरेजमधील कामगार, बॅकेतील ग्राहक,शेतकरी बांधव,महिला, समाजातील अन्य नागरिक यांना प्र.प्राचार्य डॉ. अनिल गवळी.हलकर्णीचे सरपंच एकनाथ कांबळे यांचे हस्ते कोरोना जनजागृती साठी मास्क व साबण वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू गर्दीच्या ठिकाणी ही काळजी घेताना लोक दिसत नाहीत. म्हणूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला. बाजारपेठेत किंवा इतर ठिकाणी लोकांनी अंतर ठेवले पाहिजे, कोठेही थूकू नका, साबणाने हाथ स्वच्छ धूवा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना प्रत्येक दूकानासमोर लावण्यात आल्या तसेच लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश घोरपडे, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रकल्प अधिकारी प्रा.चिदानंद तेली.डॉ. जे.जे.व्हटकर.श्री.प्रकाश बागडी.विद्यार्थी आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment