कोवाड (ता. चंदगड) ताम्रपर्णी नदीकाठावरील खचलेली जमीन. |
मागील काही दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व वळीव पावसाच्या तडाख्यामध्ये कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावरील गट नं 186,187 आणि 188 मधील जमिन दीडशे ते दोनशे फूट खचून संबधीत शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे.या जमिनीत झाड़े,विद्युत वाहिनीच्या तारा,पोल तसेच संबंधित शेतकऱ्याच्या कृषि पंपाबरोबरच पेट्या देखील असून याठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
तांबाळ नावाने असलेल्या नदीकाठावर जोतिबा चुडाप्पा वांद्रे यांचे सह तुकाराम भोगण व लक्ष्मण कुट्रे या शेतकऱ्याच्या ऊसाखालील जमिनी आहेत.
सद्यस्थीतीत जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी खोलवर भेगा पडल्या असून येथील शेतकरी वर्गाने धास्ती घेतली आहे.या भागातील सर्व शेतीला ताम्रपर्णी नदीचा वेढा असून या जमिनीवरील नदीकाठ चा भाग मोकळा ठेवला असून या जमिनीवरून कृषी पंपाना वीजपुरवठा करणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून या जमिनीत शेतकरी गवत करतात.
मागील वर्षी आलेल्या पूरामध्ये झालेल्या नुकसानीला सामोरे जातात न जातात तोवर येथील शेतकऱ्यांसमोर सदर ची जमीन नदीमध्ये वाहून जाण्याचे नवीन संकट उभे राहिले आहे.या जागेवर इतर शेतकऱ्यांचा गुरांना वैरण तसेच शेतीला पाणी देण्यासाठी चे मोटर इ. कामासाठी कायम वावर असतो.त्यामुळे वेळीच या ठिकाणी संबंधित विभागाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे नाहीतर ही जमीन नदीमध्ये वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment