चंदगड आगारातून व्यवस्थापक, दोन चालक प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त, प्रशासनाच्या वतीने सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2020

चंदगड आगारातून व्यवस्थापक, दोन चालक प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त, प्रशासनाच्या वतीने सत्कार

विजय हवालदार
चंदगड - सीएल वृत्तसेवा
         चंदगड एस टी आगरातून व्यवस्थापक व दोन चालक सेवानिवृत्त झाले आहेत. यामध्ये आगाराचे व्यवस्थापक विजय हवलदार हे आपल्या पदावरून 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले त्यांनी आपल्या काळात एस टी ला आर्थिक बाबतीत प्रगतीपथावर नेऊन राज्यात अग्रक्रम पटकावले तसेच प्रवाशांची प्रामाणिक सेवा केली आहे. 
दत्तात्रय कदम
     चालक दत्तात्रय कदम (व्हा चेअरमन,महाराष्ट्र एस टी कामगार पत संस्था) हे हि आपल्या पदावरून 32 वर्षांची सेवा करून निवृत्त झालेत. पंढरपूर वारीला ते बस फेऱ्या घेऊन जात असत त्यामुळे ते स्वतःला धन्य मानत प्रवाशांची त्यांनी प्रामाणिक  सेवा केली आहे.
शंकर पाटील
      चालक शंकर पाटील हे हि आपल्या पदावरून 28 वर्ष सुरक्षित व प्रामाणिक सेवा करून निवृत्त झाले. या सर्वांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उर्वरित आयुष्यात आपला वेळ सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घालविणार असल्याचे सत्कारमुर्तींनी सांगितले. 


No comments:

Post a Comment