चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर ( ता . चंदगड ) येथील सेवा संस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १कोटी ४६लाख पाच हजार४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे .याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे . विद्यमान अध्यक्ष,उपााध्यक्ष, संचालक , संचलिका , बँक निरिक्षक , बँक शाखाधिकारी अशा एकूण १६ जणां विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी - अडकूर ( ता . चंदगड ) येथील सेवा संस्थेतील सभासदांच्या खोट्या नोंदी व खोट्या सह्या करून कर्जरोखे न घेता पोकळ कर्ज नावे टाकण्यात आले आहे . त्यातून रोख शिल्लक कमी करून ५० लाख ९४ हजार ८५० रुपयांची उचल करण्यात आली . त्याशिवाय खोटे रेकॉर्ड तयार करून ६७ लाख रुपये आणि सभासद कर्जाच्या येणे यादीमध्ये फरकाची रक्कम २८ लाख १० हजार ४९७ रुपये ७० पैसे दर्शवून तो अपहार केला आहे . अपहाराची एकूण रक्कम १ कोटी ४६ लाख ५ हजार ४९७रुपये ७० पैसे होते
बोगस मेंबर कर्ज , खावटी कर्ज , कर्जावील व्याज न घेता बंद केलेली रक्कम , सभासदांच्या ठेवीची रक्कम सभासदांच्या सह्या न घेता उचल , खर्चाचे बिल व्हौचर्स न घेता इतर खर्चावरील रकमा अशी एकूण १कोटी ४६ लाख पाच हजार ४९७ रुपये७० पैसे संस्था रोजकिर्दीच्या जमा रकमेच्या हात शिल्लकेतून बँक चालू खातेस प्रत्यक्ष भरणा न करता फक्त किर्दीला पोकळ जमा खर्च केलेला आहे . तथापि त्यांचे भरणा काँन्टर तपासणीला उपलब्ध न झाल्यामुळे बँकेचा खाते ऊतारा मागवून वेळ घेतले असता सदर बँक चालू खातेस खर्ची पडललेल्या रकमा बँक खात्यास भरणा केलेचे दिसून येत नाहीत . कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक करून सभासदांचा विश्वासघात केला आहे व संस्थेच्या सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे . या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव , उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई , संचालक जगन्नाथ इंगवले , संतू गुरव , नारायण इंगवले, सिध्दोजी देसाई, राजाराम घोरपडे, प्रकाश इंगवले, उत्तम चिलगोंडे, महादेव नाईक, मीना शिंदे, रंजना कबाडे , लिपिक कादर कोवाडकर , सचिव पुंडलिक घोळसे यांच्यासह जिल्हा बँकेचे शाखाधिकारी आनंदा कांबळे ( रा . हाळोली ता. आजरा )जिल्हा बॅॅंक अडकूर शाखेचे निरिक्षक दादु हसन मुल्ला ( रा . गडहिंग्लज), यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक सहाय्यक फौजदार जमादार तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment