बसर्गे येथील अंध कल्लाप्पा कांबळे कूटूबांला जीवनावश्यक वस्तूचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2020

बसर्गे येथील अंध कल्लाप्पा कांबळे कूटूबांला जीवनावश्यक वस्तूचे वाटप

बसर्गे (ता. चंदगड) येथील अंध कांबळे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. 
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
 बसर्गे (ता. चंदगड) येथील जन्मताच अंध असलेल्या  कल्लाप्पा कांबळे याच्या कुंटूंबाला कोल्हापूर येथील फुले, शाहू, आंबेडकर, साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल कारंजकर, उपाध्यक्षा अलका कारंजकर यांनी दोन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात देऊन माणूसकी जपली.
    कल्लाप्पा कांबळे हा जन्मापासूनच अंध असून पत्नी अपंग आहे. असं असलं तरी त्याची जगण्याची आणि एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांना जागवण्याची उमेद मात्र त्यांची मेलेली नाही. कल्लाप्पा कांबळे व त्यांची पत्नी कल्पना कांबळे हे जीवनाशी झगडताना पाहून त्यांच्या जिद्दीला सलाम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडून येतं 
       कल्लाप्पा कांबळे यांना भरमा कांबळे व नारायण (हिरामणी)  कांबळे अशी दोन मुले असून तीही  जन्मापासून अंध आहेत. नारायण  हा गायन करतो व उत्कृष्ट सिंथ वाजवितो तर भरमा हा उत्कृष्ट ढोलकी वाजवितो. कल्लापा कांबळे पत्नीच्या आधाराने आसपासच्या गावागावात फिरून अभंग, गिते,पोवाडे गाऊन  मिळेल त्या पैशावर कशीतरी उपजीविका करतात*. 
       गेले तीन महिने कोरोनाच्या संकटाने जगात हाहाकार माजवला. सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला. संचारबंदीमुळे कल्लाप्पा कांबळे यांच्या कुटुंबियांच्या जगण्यावर संकटच कोसळलं. उपासमार होऊ लागली हे समजताच कोल्हापुरातील फुले, शाहू, आंबेडकर,  साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल कारंजकर,  उपाध्यक्षा अलका कारंजकर यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत बसर्गे येथे    स्वता दिली.
        तांदूळ, गहू, जोंधळे प्रत्येकी वीस किलो, साखर पाच किलो. तेल तीन लिटर, तूरडाळ, शाबू, रवा, पोहे प्रत्येकी दोन किलो. हरभरा, वाटाणा, मटकी, मसूर, चवळी प्रत्येकी एक किलो चहापूड अशा जीवनावश्यक धान्याचे किट दोन महिने पुरेल इतके कल्लाप्पा कांबळे यांना देऊन माणुसकीचे दर्शन कारंजकर कुटुंबीयांनी घडविले आहे. 
        इंजिनिअर मोहन गोखले, मारुती कांबळे, संतोष कांबळे, अमरोळीचे पत्रकार विजयकुमार कांबळे या सर्वांच्या हस्ते ही मदत  देण्यात आली.


No comments:

Post a Comment