![]() |
सचिन शिवलिंग पाटील |
कल्याणपूर (ता. चंदगड) सचिन शिवलिंग पाटील यांची महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेच्या चंदगड तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाली. सचिन पाटील सध्या अग्रिकल्चर अँड बिझनेस मॅनजमेंट , नारायगाव (पुणे) या कॉलेज मध्ये कृषी शिक्षण घेत आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील, सूरज खोमणे पाटील (प्रदेश अध्यक्ष, युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश) , विजय मगदूम (कोअर कमिटी मेंबर) यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील पदवीधर, विदयार्थी, शेतकरी, कृषी मालाचे प्रश्न सोडिण्यासाठी, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रद्यानाचा वापर, शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले. मधुकर कोकीतकर, विजय पाटील, शिवलिंग पाटील यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment