यूनियन बँक शाखा कुदनुर येथे निवेदन देताना शंकर तवनोजी , पुंडलिक मल्हारी. |
तेऊरवाडी- सी .एल. वृत्तसेवा
युनिअन बॅंक ऑफ इंडिया शाखा कुदनूर ( ता. चंदगड ) कडून कर्मचारी कमी असल्याची कारणे सांगत सर्व प्रकारची कर्ज प्रकरणे नामंजूर केली जात आहेत . ही सर्व प्रकरणे येत्या दहा दिवसात मंजूर करण्याची प्रक्रिया करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संघर्ष कृती समितीने दिला आहे.
बँकेमार्फत पिक कर्ज ( किसान कार्ड), मुद्रा लोन, बेरोजगारासाठी लोन, महिला बचत उदयोगासाठी कर्ज देण्यात येते. सध्या या कर्जासाठी अनेक जन बॅकेकडे ये -जा करत आहेत . पण या सर्वाना कर्मचारी कमी असल्याची कारणे सांगत परतावून लावले जात आहे. येत्या १० दिवसात कोणतीही कारणे न सांगता मागणी असणाऱ्यांची तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा बॅकेच्या शाखाधिक ऱ्यांना एका निवेदनाद्वारे संघर्ष कृती समितीने दिला आहे. या निवेदनावर समितीचे कुदनुर विभाग प्रमूख शंकर तवनोजी, पुंडलिक मल्हारी , विलास सरमळकर, जनार्दन नागरदळेकर, चंद्रकांत कोकितकर आदिंच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment