पावसाने ओढ दिल्याने चंदगड तालुक्यातील पिके कोमेजली, दुबार पेरणीच्या संकट - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2020

पावसाने ओढ दिल्याने चंदगड तालुक्यातील पिके कोमेजली, दुबार पेरणीच्या संकट

चंदगड / प्रतिनिधी
        ऐन पावसाळ्यात चंदगड  तालुक्यात पाऊसाने ओढ दिल्याने भात, नाचना,रताळी,भुईमूग,आदी पिके कोमेजण्यास सुरवात झाली आहेत.काही ठिकाणी पाण्या अभावी पिके मरण पावत आहेत,त्यामुळे शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. दोन दिवसात पावसाने सुरवात केल्यास तग धरून असलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे.
      पावसाने ओढ दिल्याने माळरानावरील रोपलागवड खोळंबली असून शेतकरी चिंतातूर आहे . पावसाने जून महिन्याच्या पूर्वार्धापासून दमदार हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली होती . सतत ढगाळ वातावरण व अधुनमधून पाऊस सुरू राहिल्याने भात , नाचणा , भुईमूग , भाताच्या तरव्यांची पेरणी केली . सर्व पिकांची चांगली उगवण झाली . भुईमूगाची कोळपणी तर कुरीने पेरणी केलेल्या भाताची ' बाळभांगलण ' सुरू आहे . काही शेतकरी मोटरपंपाद्वारे पाण्याची व्यवस्था करून रोप लागवडीचा हंगाम साधत आहेत.

No comments:

Post a Comment