तेऊरवाडी / प्रतिनिधी
आज चंदगड तालूक्यातील अडकूर येथे राहणाऱ्या ४९ वर्षिय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चंदगड तालूक्यासह कोल्हापूर जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत कोल्हापूर जिल्हयात जेवढे कोरोना रुग्ण सापडले आहेत ते सर्व पूणे , मुंबई येथून आलेले आहेत. तसेच मयत झालेले आठ रुग्ण सुद्धा बाहेरूनच आलेले होते . पण सध्या अडकूर (मूळ गाव मोरेवाडी ) येथे राहणारी ही व्यक्ती स्थानिक होती . त्यांची आई पाच आठवड्यापूर्वी पूणेवरून गावी आली होती . सदर मयत झसमाला दोन दिवसापासून त्रास चालू झाल्याने गडहिंग्लज व तेथून कोल्हापूर सीपीआर ला दाखल केले होते . आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला .सदर इसमाचा चंदगडला स्वॅब घेतला होता . तो पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे . प्रशासनाने तात्काळ अडकूरकडे धाव घेऊन मयत इसमाच्या संपर्कात कोण- कोण आले याची शोधमोहिम राबवली आहे. अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉं. बी. डी. सोमजाळ व सर्व कर्मचारी, प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलिस अधिकारी अडकूरमध्ये ठाण मांडून आहेत. संबधीत मयत इसम अनेकांच्या संपर्कात आला असल्याची चर्चा चालू या सर्वाना शोधून काढणे प्रशासनासमोर मोठ आव्हान असणार आहे.
No comments:
Post a Comment