नारायण गडकरी यांना जि.प. चा आचार्य अत्रे पत्रकारीता पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2020

नारायण गडकरी यांना जि.प. चा आचार्य अत्रे पत्रकारीता पुरस्कार

नारायण गडकरी
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         चंदगड तालुक्यातील कार्वे येथील दै. पुढारीचे तालुका प्रतिनिधी नारायण गडकरी यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.नारायण गडकरी यांनी गेली २८ वर्षे पत्रकारीकतेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यानी आपल्या पत्रकारीकतेच्या कारकिर्दीत अनेक समाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, यासह अन्य वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे.त्यांच्या निर्भिड व सडेतोड लिखानामुळे अनेक जटील प्रश्न तालुक्यातील मार्गी लागले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने त्यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर केला आहे.यापूर्वीही अशा अनेक सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.त्यामुळे चंदगड तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना दैनिक पुढारी चे मुख्य संपादक पदमश्री डॉ. प्रतापसिंहजी जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेशजी जाधव यांची प्रेरणा, आणि मार्गदर्शन लाभले. No comments:

Post a Comment