अखेर अडकूरला कोरोनाने गाठलेच! त्या दोन रुग्णांच्या संपर्कातीत ४४ जणाना संस्थात्मक विलगीकरण - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2020

अखेर अडकूरला कोरोनाने गाठलेच! त्या दोन रुग्णांच्या संपर्कातीत ४४ जणाना संस्थात्मक विलगीकरण

सी.एल. वृत्तसेवा अडकूर / संजय पाटील
        आमच्या गावात कोरोना येणार नाही या अविर्भावात वावरून लॉक डॉऊन नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अडकूर ( ता. चंदगड ) येथे काल दि .२५ रोजी दोन रुग्ण सापडले .यापैकी  एकाचा मृत्यू झाल्याने या परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अखेर नाही -नाही म्हणत अडकूरला कोरोनाने गाठलेच . प्रशासनाने रात्री व आज सकाळी या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील ४४ जनांना चंदगड येथे संस्थात्मक विलगीकरण केले असून आणखी कोन संपर्कात आले आहेत याचा शोध घेतला जात आहे .
       चंदगड तालूक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून अडकूरकडे पाहिले जाते . आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालूक्यातील जवळपास ४० खेडयांचे मध्यवर्ती ठिकाण अडकूर आहे . येथे राष्ट्रीयकृत बँका , शैक्षणिक संस्था , प्राथमिक आरोग्य केंद्र आहे . त्यामूळे रोज हजारो जणांची येथे ये - जा चालू असते .कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सुरवातीला अडकूर ग्रामपंचायतोला ग्रामस्थांनी सहकार्य करत कडक लॉक डाऊन नियमांचे पालन केले . याच काळात गावाला लागून असणाऱ्या  अलाबादेवी , मोरेवाडी , सत्तेवाडी , सोनारवाडी आदि गावामध्ये कोरोणाचे रुग्ण सापडले . पण या सर्वापासून मोठी बाजारपेठ व मुंबई वरुन  आलेल्यांची प्रचंड संख्या आसूनही अडकूरमध्ये रूग्ण सापडला नव्हता . त्यामूळे हळूहळू येथील बाजारपेठ चालू झाली . लोकांची वर्दळ वाढली . आणि यामध्येच पहिलाच रुग्ण मूळ गाव मोरेवाडी पण राहणार अडकूर सापडला . पण या रुग्णाच्या मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली .पाठोपाठ 
        केंचेवाडीच्या रुग्णाच्या संपर्कात  आलेल्या अडकूर येथील दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा अडकूला मोठा धक्का बसला . तात्काळ प्रशासनाने धाव घेऊन संबधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध चालू केला . प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरचे वैद्यकिय अधिकारी डॉं .बी. डी . सोमजाळ यानी थेट संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहिम राबवली . यावेळी मृत रुग्णाच्या थेट संपर्कात आलेले ३० जण तर दुसऱ्या रुग्णाच्या संपर्कात असलेले १४ जण अशा ४४ जणांना चंदगडला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे . याबरोबरच मृत रूग्ण  पॉझिटीव्ह कसा झाला ? याचा शोध घेतला जात आहे . संबधीत मृत रूग्ण मुंबईला जाऊन  आल्याची चर्चा अडकूरमध्ये दबक्या आवाजात चालू असून प्रशासनाने याचा शोध घेणे गरजेचे आहे.
   सध्या तरी अडकूर बाजारपेठ व गाव बंद ठेवण्यात आले आहे . वैद्यकिय अधिकारी डॉ .बी.डी. सोमजाळ अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत . तसेच कोणताही त्रास झाला तर आरोग्य केंद्राशी संपर्क साधन्याचे आवाहन डॉ. सोमजाळ यानी केले आहे.या घटनेने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


No comments:

Post a Comment