संततधार पावसामुळे नद्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शहर परिसरात आज दिवसभर पावसाने झोडपले. तालुक्याच्या सर्वच भागात गेल्या चार दिवसापासून पावसाने रिघ घरली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात चंदगड तालुक्यात एक जून 2020 पासून सरासरी 67.83 मिलीमीटर तर आतापर्यंत एकूण सरासरी 351.66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात चंदगड येथे गफार मोहदिनसो नदाफ यांच्या घरावर झाड पडून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या संततधार मान्सुच्या पावसामुळे नद्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शेत-शिवारामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसाचा लाभ शेतकऱ्यांना पेरण्यासाठी झाल्याने शेतकऱ्यांच्या धुळवाफ पेरण्या जवळपास पुर्ण झाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीला यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत गतीने होत असल्याने हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांनाचा याचा चांगला लाभ होत आहे. भुईमूग व रताळी लागवडीची सद्या सर्वत्र धांदल सुरु असल्याचे चित्र माळरानावरील शेतामध्ये दिसत आहे.
चंदगड तालुक्यात मंडलनिहाय पाऊस असा - चंदगड (९४ मि. मि), नागणवाडी (७९ मी. मी.), माणगाव (२१ मी. मी.), तुर्केवाडी (५६ मी. मी.), कोवाड (३४ मी. मी.), हेरे (१२३ मी. मी.). आज सकाळपर्यंत सर्वांधिक पावसाची नोंद हेरे येथे तर सर्वांत कमी पावसाची नोंद माणगाव मंडलमध्ये झाली आहे.
No comments:
Post a Comment