मजरे कार्वे येथील महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह, पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2020

मजरे कार्वे येथील महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह, पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला मोकळा श्वासमजरे कार्वे /सी एल न्युज
        मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे ११ जून रोजी हरियाणा येथून आलेली ५८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. या महिलेला मिरज रेल्वे स्थानकावरून घेऊन आलेले तिघे व येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात संपर्कात आलेल्या एकाला चंदगड येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या चौघांचेही स्वँब शनिवारी घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट मंगळवारी रात्री आला असून हे चौघेही कोरोना निगेटिव्ह जाहीर करण्यात आले आहेत.
          संबंधित चौघांपैकी दोघे मजरे कार्वे येथील, एक जण तावरेवाडी येथील तर एक जण बसर्गे येथील होता. त्यामुळे या तिन्ही गावासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण होते. गेल्या चार दिवसापासून मजरे कार्वे, पाटणे फाटा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. या परिसरात  मोठी दहशत पसरली होती. मात्र या चौघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. तीन महिन्यापासून सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून या ठिकाणी काळजी घेण्यात आली होती. कुणालाही कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आली होती. बुधवारपासून ग्रामपंचायतीमार्फत येथील व्यवहार हळूहळू सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment