कुदनुर ओढा पात्रातील धक्क्याचे बांधकाम गतिमान, ग्रामस्थ वाहनधारकांकडून समाधान व्यक्त - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2020

कुदनुर ओढा पात्रातील धक्क्याचे बांधकाम गतिमान, ग्रामस्थ वाहनधारकांकडून समाधान व्यक्त

कुदनूर नजीक ओढा पात्रात युद्धपातळीवर सुरू असलेले धक्क्याचे बांधकाम.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
        कालकुंद्री मार्गावरील कुदनूर नजिक ओढा पात्रात फेब्रुवारीपासून सुरू असलेले धक्क्याचे बांधकाम कोरोना संकटामुळे रखडले होते ते  पुन्हा गतिमान झाल्याने प्रवासी, वाहनधारकांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
        किटवाड कडून येणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कालकुंद्री- कुदनुर रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. रस्त्यापासून ओढ्याचे पात्र पंधरा फूट अंतरावर होते. तथापि दरवर्षी पाण्यामुळे जमिनीची धूप झाल्यामुळे गेल्या दोन वर्षात ओढ्याचे पात्र रस्त्याला येऊन ठेपले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम कडून येथे ठेकेदारांमार्फत फेब्रुवारीत धक्का बांधकाम सुरू करण्यात आले तथापि कोरोनामुळे काम बंद होते.  पुन्हा गतिमान झाले आहे.  बांधकाम रखडले असते तर पावसाळ्यात येणाऱ्या ओढ्यातील पुराच्या पहिल्याच दणक्यात रस्ता वाहून जाण्याचा धोका होता. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. वेळोवेळी चंदगड लाईव्ह न्युज चॅनेलने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्याबद्दल परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांतून सी एल न्यूज चे आभार व्यक्त होत आहेत. हा रस्ता कोवाड-बेळगाव मार्गावरील कागणी पासून कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी, दड्डी ते राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी पर्यंत जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.


फोटो :

No comments:

Post a Comment