४४ स्वॅब अहवाल निगेटीव्ह समूह संसर्गाचा धोका टळला
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
अडकूर ( ता. चंदगड ) येथे आज चौथा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला .केवळ साडेतीन वर्षाच्या मूलाला कोरोनाची लागण झाली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . काल घेतलेल्या ४६ स्वॅब पैकी ४४ अहवाल निगेटीव्ह आल्याने समूह संसर्गाचा धोका टळला असल्याची माहीती अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉं .बी.डी. सोमजाळ यानी दिली .
येथे मूळ गाव मोरेवाडी पण सध्या राहणार अडकूर येथील एका रुग्णाचा कोरोणाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती . त्याच दिवशी दुसऱ्या एका व्यक्तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. काल या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या ४६ जणांचे स्वॅब घेतले होते . यापैकी ४४ अहवाल निगेटीव्ह आले तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले . यामध्ये मृत रुग्णाची आई व दुसऱ्या रुग्णाच्या साडेतीन वर्षाचा नातू यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला . यामूळे समूह संसर्गाचा धोका टळला आहे .आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ . सोमजाळ यानी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन अडकूर बाजारपेठेतील ज्याना बीपी , शुगर अशा
रुग्णाना तपासणी साठी चंदगडला पाठवले .आज १०० जणांचे स्वॅब घेतले आहेत तर पुन्हा उद्या १०० जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत . कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेण्यात येत आहे . आता जे रुग्ण सापडलेत ते कुंटूबातीलच सदस्य आहेत .समूह संसर्गाचा कोणताही धोका नाही .ग्रामस्थांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन डॉ़ . सोमजाळ यानी केले आहे .
No comments:
Post a Comment