अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर ( ता. चंदगड ) येथे चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले . यापैकी एका रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला . यामुळे अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व चंदगड कोविड केअर सेंटरचे वैद्यकिय अधिकारी डॉ .रत्नदिप कांबळे यानी अडकूर परिसरातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे .
डॉ . सोमजाळ आपल्या आवाहनामध्ये म्हणतात की .मी वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य केंद्र अडकूर आज दिनांक 28.6. 2020 अखेर अडकूर परिसरामध्ये हे एकूण 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. आत्तापर्यंत सापडलेले सर्व रुग्ण हे मुंबई पुणे इथून आलेले होते , परंतु नुकतेच अडकूर गावामध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत.
पैकी मृत व्यक्ती यास कोणापासून लागण झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही . त्यामुळे सदरील रुग्णास अडकूर परिसरातूनच लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही .अडकूर परिसरातील व चंदगड परिसरातील तालुका नागरिकांना खालील प्रमाणे नम्र व कळकळीची आव्हान करितो की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी .
सर्व नागरिकांनी बाहेरून जाऊन आल्यानंतर उदाहरणार्थ डेअरीमध्ये ,बँक सोसायटी ,दवाखाना , बाजार ,किराणा दुकान ,
पंचायतीमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर
आपले हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे हे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे.नागरिकांनी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाताना आपले तोंड व नाक हे पूर्णपणे झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरावा अथवा साधा रुमाल वापरावा.नागरिकांनी पुढील काही महिन्यांसाठी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचे टाळावे उदाहरणार्थ दुसऱ्याच्या लग्नात जेवण्यास जाणे,
दुसऱ्याबरोबर पार्टी करणे ,दुसऱ्याच्या बर्थडे पार्टीत जाणे इत्यादी गोष्टी करू नयेत व इतर लोकांना आपल्या घरातील कार्यक्रमात शक्यतो पुढील कालावधीत बोलावू नये. नागरिकांनी पुढील कालावधीत आपले शेत आपला व्यवसाय व आपले घर यांच्याशीच मर्यादित राहावे .
विनाकारण चार चौघे एकत्र येऊन काही कारण नसताना उगीचच बोलत बसू नये.
उगीचच मित्रांसोबत गप्पा-गोष्टी करत बसू नये .आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना झाला आहे हे असे समजून आपण वागणे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे
अन्यथा या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असून आपल्या परिसरात सुद्धा भविष्यात सामूहिक संसर्ग होऊ शकतो जे नागरिक पुणे मुंबई व कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून आलेले आहेत त्यांनी कोरोना केअर सेंटर चंदगड येथे जाऊन तपासणी करून चौदा दिवसासाठी संस्थात्मक अलगीकरण कक्षातच राहावे .कोणत्याही परिस्थितीत घरी राहु नये . नागरिकांनी काही कारण नसताना बाहेरगावी जाण्याचे शक्यतो टाळावे या सर्व गोष्टी नागरीकांनी तंतोतंत पाळल्या तरच आपण कोरोनाच्या सामूहिक संसर्गापासून दूर राहू शकतो .
मला आशा आहे आपण सर्वजण मिळून काटेकोरपणे नियमांचे पालन करून या आजाराचा संसर्ग परिसरात व तालुक्यात होणार नाही ही याची काळजी घेऊया . अशा प्रकारचे आवाहन डॉ . सोमजाळ यानी केले आहे.
No comments:
Post a Comment