विकास जोतिबा वरपे |
डुक्करवाडी-रामपूर (ता. चंदगड) येथील विकास जोतिबा वरपे (वय वर्षे- 18) या यूवकाने आपल्याला अँड्रॉइड मोबाईल फोन मिळत नसल्याच्या कारणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी बारा वाजता घडली. विकासने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. आपले वर्गमित्र अँड्रॉइड मोबाईल चा वापर करतात. त्यामुळे तो आपल्या वडिलांच्याकडे अँड्रॉइड मोबाईलची मागत करत होता. पण वडिलांनी सध्या आपल्याकडे पैसे नसल्याने पुढच्या महिन्यात मोबाईल घेऊन देतो असे सांगितले होते. तरीही विकास नाराज होता. आज सकाळी घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले असता घरात कोण नसल्याचे पाहून विकासने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ,आजी आजोबा असा परिवार आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment