हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान - डॉ सतीश घाळी
गडहिंग्लज - सी. एल. वृत्तसेवा
काळाच्या ओघात मुलींच्या जन्माचे स्वागत ही आता सकारात्मक पद्धतीने केले जात आहे. मुलाच्या जन्माला पेढा आणि मुलगीच्या जन्माला जिलेबी ही पारंपरिक बंद पद्धत बंद होऊन, समाजातील विचारी लोक मुलीच्या जन्माचे स्वागत ही आता पेढा आणि पुस्तक देऊन करत आहेत, कोल्हापूरातील वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या सहसमन्वयक डॉ. सरोज बिडकर यांनी १८ मे रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, लग्नानंतर तब्बल १८ वर्षांनंतर त्यांना अपत्य प्राप्ती झाली आणि तीही जुळ्या मुलींची. या गोष्टीचे अप्रूप मानून बिडकर दाम्पत्याने, या मुलींच्या जन्माचे स्वागत, आप्तेष्टना, हितचिंकांना, नातेवाईकांना पुस्तक आणि पेढा देऊन करण्याचे ठरवले. घरी मुलगी जन्मली, मुलगी म्हणजे परक्याच धन या साचेबंध विचारला तिलांजली देत, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समाजात असलेल्या विषमतेला बिडकर दाम्पत्यानी फाटा देत नवा पायंडा पाडला आहे.
गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ घाळी महाविद्यालयात प्रा. डॉ. सरोज बिडकर यांना वैचारिक वसा मिळाला तो पुस्तकप्रेमातून, यातूनच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात वाचनकट्टा या चळवळीत काम करत वाचन चळवळ वाढावी, ती वृद्धीगत व्हावी यासाठी बिडकर दाम्पत्यांनी आपल्या घरापासून वैचारिक भान जपत, मुलींच्या जन्माचे स्वागत पुस्तक आणि पेढे देऊन करत आहेत. आतापर्यंत ३००पुस्तकांचं वाटप करण्यात आलं असून, एकूण १००० पुस्तकं वाटप करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली.
No comments:
Post a Comment