विधान परिषद साठी पत्रकार एस.एम.देशमुख निवड करण्याची चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2020

विधान परिषद साठी पत्रकार एस.एम.देशमुख निवड करण्याची चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी

एस. एम. देशमुख
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          लवकरच विधान परिषदेसाठी १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, राज्यपालांच्या कोट्यातून पत्रकार, विचारवंत, साहित्यिक, कलावंत यांची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आणि परंपरा आहे, त्या अनुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन नुकताच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मा.राज्यपाल (महाराष्ट्र राज्य).याना पाठवण्यात आले आहे.
              निवेदनात असे म्हटले आहे की,एस.एम.देशमुख हे गेली ३०-३५ वर्षे पत्रकारितेत असून त्यातील २३ वर्षे विविध मान्यवर दैनिकात त्यांनी संपादक म्हणून उल्लेखनिय कार्य केलेले आहे, या काळात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली, देशात प्रथमच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला आहे त्याचे सर्वस्वी श्रेय फक्त आणि फक्त एस.एम.देशमुख यांचे आहे, पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी सतत २२ वर्षे संघर्ष केला अंतिमत:एस.एम.देशमुख यांचा लढा यशस्वी झाला आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुरू झाली आहे, पत्रकार आरोग्यासाठीची शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची झालेली रचना हे एस.एम.देशमुख यांच्या प्रयत्नांचे फळ आहे, छोटया आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांचे काही प्रश्न होते, एस.एम. देशमुख यांच्या प़यत्नामुळे ते प़श्न देखील मार्गी लागले आहेत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त, आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक असलेले एस.एम.देशमुख हे पत्रकारांसाठी देवदूत ठरले आहेत, अडचणीत असलेल्या पत्रकारांना देशमुख यांच्या प्रयत्नांतून जवळपास ४० लाख रूपयांची मदत गेल्या दोन वर्षांत दिली गेली आहे, एस.एम.देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले तर रस्त्यावरील अपघात तर कमी होतीलच त्याचबरोबर कोकणच्या विकासालाही गती मिळेल त्यामुळे हा महामार्ग झाला पाहिजे अशी मागणी करीत त्यांनी त्यासाठी सलग सहा वर्षे संघर्ष केला,अखेर त्यात ते यशस्वी झाले, महामार्गाचं काम आता सुरू आहे,कोकणातील शेतकरयांचे प्रश्न असोत, पिण्याच्या पाण्याची समस्या असो की, मोठ्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांचे प़श्न असोत देशमुख यांनी निर्धाराने हे प्रश्न मांडले आणि यशस्वी करून दाखविले, बीड जिल्हयातील आपल्या देवडी या गावात पाणी टंचाई होती, ती दूर करण्यासाठी एस.एम.देशमुख यांनी सकाळच्या माध्यमातून मोठा बंधारा बांधून पाणी टंचाईचे संकट हद्दपार केले, गावातील प्राथमिक शाळा स्वखर्चाने डिजिटल करून दिली, गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हरितक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.. 
           वैचारिक क्षेत्रातील देशमुख यांचे कार्य उल्लेखनिय आहे. स्वतः उच्चविदयाविभूषीत (एम. कॉम. बी. जे.) असलेल्या एस. एम.देशमुख यांची ८ पुस्तकं प्रसिध्द आहेत, कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल दिला जाणार कृषीमित्र या पुरसकारासह देशमुख यांना विविध २२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे, विविध दैनिकात विविध विषयांवर देशमुख यांचे ५000 च्या वर लेख प्रसिद्ध झाले आहेत,विविध मराठी वाहिन्यांवरून ज्वलंत प्रश्नावरील  आपली रोखठोक मतं निर्भयपणे मांडताना आपण देशमुख यांना सातत्यानं पहात असतो. 
          एस. एम.देशमुख एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व आहे, कायद्याचा चांगला अभ्यास आणि संसदीय कामाची चांगली माहिती असल्याने ते आमदार म्हणून नक्कीच उल्लेखनिय काम करतील, आपला ठसा उमटतील याची आम्हाला खात्री आहे, तेव्हा विनंती की विधान परिषद सदस्य म्हणून एस.एम.देशमुख यांना काम करण्याची संधी द्यावी ही महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांची ईच्छा आणि विनंती आहे, आम्हा पत्रकारांच्या  विनंतीचा आपण सकारात्मक विचार कराल अशी अपेक्षा करत मागणी या निवेदनाद्वारे   करत आहोत, आणि पत्राचे उत्तर मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. असे म्हटले आहे.अध्यक्ष नंदकुमार ढेरे, यांनी चंदगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने राज्यपाल याना निवेदन पाठवले आहे.


No comments:

Post a Comment