चारित्र्य पडताळणी दाखले ऑनलाईन मिळणार दाखल्यांसाठी कार्यालयात न येण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2020

चारित्र्य पडताळणी दाखले ऑनलाईन मिळणार दाखल्यांसाठी कार्यालयात न येण्याचे आवाहन

कोल्हापूर / प्रतिनिधी
      पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी Digital Sign ची सुविधा दि. 15 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी दाखल्यांसाठी अर्जदाराने प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊ नये, असे आवाहन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी केले आहे.
       राज्य शासनाने Pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्हेरीफिकेशन (चारित्र्य पडताळणी/वर्तणुक दाखला) ची सुविधा सन 2016 पासून सुरू केली आहे. Pcs.mahaonline.gov.in या पोर्टलवर अर्जदाराने स्वत:चा चारित्र्य पडताळणी फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराने चारित्र्य पडताळणीबाबत ते वास्तव्यास असलेल्या हद्दितील संबंधित पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करून अर्ज मंजूर केला जातो. 
       संबंधित पोलीस ठाण्याकडून अर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर PCC Approved by Local Police station असा संदेश येतो. त्यानंतर हे प्रकरण पुढील कार्यवाहीकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा येथे येते. जिल्हा विशेष शाखेत याची तपासणी करून Approved करून Digital Sign केल्यानंतर संबंधित अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर PCC Approved by SP Office Download Certificate from your Login असा संदेश येतो. संदेश प्राप्त होताच संबंधित अर्जदाराने आपल्या Login Account वरून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रिंट काढायची आहे. 
         चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रिंट काढण्यासाठी संबंधित अर्जदार यांनी आपले Computer/ Laptop वर Java Application (jre-7u79-windows-i586) तसेच Adorbe Reader 11.0 हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून Mozilla firefox setup 42.0 या  Browser वरून प्रमाणपत्राची प्रिंट प्राप्त करून घ्यावी. प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास संबंधित अर्जदाराने यु ट्युब वरील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे याबाबतचा व्हिडीओ पाहिल्यास चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण होणार नाही,असे श्री. पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 


No comments:

Post a Comment