विद्याधर गुरबे संवस्थापक आयडियल कम्प्युटर समूह, गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य व सहकारी. |
नेसरी पंचक्रोशीतील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी नेसरी ता. गडहिंग्लज येथील अभियंता विद्याधर गुरबे यांनी १९ वर्षापुर्वी आयडियल समुहाची सुरुवात नेसरी येथे २६ जुलै २००१ रोजी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श समोर ठेवून केली होती.
संगणक क्षेत्रातील अनेक कोर्स आयडियल च्या माध्यमातून एका छत्राखाली खाली आणण्याचे मोठे कार्य गुरबे यांनी केले आहे. यामुळे नेसरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संगणक विश्वातील आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. कम्प्युटर संबंधीत सर्व कोर्स व तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन शिबिरे आयोजित केल्यामुळे नेसरी पंचक्रोशी व विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासह संगणक क्षेत्रातील अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत.
गेल्या 19 वर्षात विद्याधर गुरबे यांच्या समाज व विद्यार्थी भिमुख कार्यामुळे आयडियलच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आयडियल समूहाचा 19 वा वर्धापन दिन कार्यक्रम कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन करून साधेपणाने साजरा करण्यात आला. आयडियल च्या नेसरी येथील कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमावेळी आयडियल समुहाचे प्रमुख व गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, विनायक नाईक, स्वप्निल देसाई, शिवयोगी हिरमेठ व पुजा देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment