नांदवडे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीला सरपंच सौ. संज्योती मळवीकर यांच्याकडे झाडे भेट देताना मुंबईकर ग्रामस्थ लक्ष्मण गावडे, शेजारी उपस्थित ग्रामस्थ. |
नांदवडे (ता. चंदगड) येथे कोरोनाच्या काळात अनेक चाकरमानी मुंबईहून नांदवडे गावी आले होते. या काळात मुंबईवरुन आलेल्या ग्रामस्थांना गावाबाहेरील शाळेत त्यांना क्वारंटाईन केले होते. या काळात ग्रामपंचायतीच्या वतीने उत्तम सोय केल्याबद्दल सेवेला भारावून मुंबई ग्रामस्थांकडून नांदवडे ग्रामपंचायतीला आज पुणे मुंबई क्वारंटाईन लोकांनी ग्रामपंचायत नांदवडेला पिंपळ, वड, पेरू, चिक्कू, अशी झाडे भेट देऊन स्वतः वृक्षारोपण केले.
यावेळी सरपंच संज्योती मळविकर, उपसरपंच संतोष गावडे, माजी सरपंच ॲड. संतोष मळवीकर, सदस्य देमाना पाटील, विठोबा गावडे, कृष्णा सुतार, संजीवनी सुतार, प्रतीक्षा गावडे, शीतल गावडे, जकोबा कांबळे, ग्रामसेवक अश्विनी कुंभार , गोपाळ कांबळे हजर होते. मुंबईचे लक्ष्मण गावडे, सुभाष अपटेकर, सुरेश गावडे, सुधाकर गावडे, मारुती गावडे, शंकर गावडे, मोहन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment