चंदगड तालुक्यातील पाऊस झाला क्वारंटाईन, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2020

चंदगड तालुक्यातील पाऊस झाला क्वारंटाईन, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे

दौलत हलकर्णी / सी. एल. वृत्तसेवा
         अति पावसाचा भाग म्हणुन समजल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातुन गायब झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चितेंचे वातावरण आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी वर्गाला शेतीविषयक साहित्य खरेदी करण्यास बराच त्रास झाला. त्यातुनच बऱ्यापैकी शेतीची कामे आवरली आहेत. पण आता गरज आहे ती पावसाची.
          गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. महापुरातुन सावरत असतानाच कोरानाच्या संकटाने घाला घातला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धावाधाव करुन शेतात पेरणी केली पण अचानक कोरोना होऊण पाऊस क्वांरनटाईन झाला आहे.
          गतवर्षीच्या पावसाच्या पंचवीस टक्के देखील पाऊस न झाल्यामुळे भात व इतर पेरणी केलेल्या जमिनींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे क्वांरनटाईन झालेला पाऊस परत येतोय की गायब होतोय याचा विचार शेतकरी वर्ग करत आहे.

No comments:

Post a Comment