नेसरी ग्रामपंचायतीला हॅन्डवॉश सॅनिटायझर मशिन भेट - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2020

नेसरी ग्रामपंचायतीला हॅन्डवॉश सॅनिटायझर मशिन भेट

नेसरी ग्रामपंचायतीला सॅनिटाय झर हँड वॉश मशीन देताना विद्याधर गुरबे.
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
         महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष  सतेज उर्फ बंटी पाटील  यांच्या सहकार्यातून गोर गरीब जनतेला व वाढत्या कोरोनाच्या प्रदुर्भावामूळे मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी तसेच सामान्य लोकांच्यासाठी मोठ्या ग्रामपंचायतींना  विद्याधर गुरबे  ( गडहिंग्लज पंचायत समिती माजी उपसभापती ) यांच्या संकल्पनेतून गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी ग्रामपंचायतीला Hand Wash सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिले.
        सदरच्या मशीनचे उदघाटन  मुन्नासो नाईकवाडी साहेब ( अध्यक्ष तं. मु. समिती नेसरी ) नेसरी सरपंच आशिष साखरे, उपसरपंच  अमर हिडदुग्गी, सदस्य  रामचंद्र परीट, पी. बी. पाटील ( ग्रा. वि. अधिकारी ), सागर हिरेमठ ( संचालक गोड साखर हरळी ), विलास हल्याळी,  कार्तिक कोलेकर, प्रकाश मुरकुटे, उपस्थित नेसरीतील नागरिक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment