वाढत्या रुग्नामुळे 3 जुलै ते 10 जुलै कोवाड बाजारपेठ बंद, ग्रामस्तरीय कमिटीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2020

वाढत्या रुग्नामुळे 3 जुलै ते 10 जुलै कोवाड बाजारपेठ बंद, ग्रामस्तरीय कमिटीचा निर्णय

कोवाड / सी एल वृत्तसेवा
         जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातला असून भारतासहित राज्यात देखील कोरोणा बाधित रुग्णाचा आकडा हा वाढत चालला आहे.गडहिंग्लज उपविभागातील आजरा आणि गडहिंग्लज  तालुक्यासह चंदगड तालुक्यात वाढते स्थानिक रुग्ण प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत.तालुक्यातील अडकुर,मुगळी, शिनोळी, हलकर्णी याठिकाणी स्थानिक रुग्ण आढळून आले असून  कर्यात भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोवाड या ठिकाणी बाजारपेठेत गर्दी होत असल्यामूळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शुक्रवार 3 जुलै ते 10 जुलै पर्यंत कोवाड मधील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय ग्रामस्तरीय कमिटीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.पुढील काही दिवस संभाव्य धोका ओळखून सगळे व्यवहार अत्यावश्यक सेवाअंतर्गत दवाखाने,मेडिकल व दूध डेअरी व्यतिरिक्त किराणा दुकान,भाजीपाला विक्रीची दुकाने बंद असणार आहेत.
             प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार विनोद रणावरे यांचेकडून बाजारपेठेची पाहणी करून याबाबत ग्रामपंचायतीला बाजारपेठ बंद करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.त्यानुसार स्थानिक प्रशासनाने येथील व्यापारी संघटनेला सूचना केल्या असून संघटनेने देखील प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत आज दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला.तर नागरिकांकडून देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment