तहसिलदार रणवरे यांनी स्वतः बंद केला हलकर्णी व पाटणे फाटा. दक्षता कमिटीसह प्रशासन अधिक दक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2020

तहसिलदार रणवरे यांनी स्वतः बंद केला हलकर्णी व पाटणे फाटा. दक्षता कमिटीसह प्रशासन अधिक दक्ष

पाटणे फाटा ता.चंदगड येथे तहसीलदार विनोद रणवरे यानी स्वता लाऊडस्पीकर वरून व्यापाराना दूकाने बंद करण्याचे आवाहन करताना

चंदगड/प्रतिनिधी 
कोल्हापूर जिल्हयात सर्वाधिक स्थानिक कोरोना रुग्णांचा विळखा चंदगड तालुक्यातील बसला आहे. अडकूर येथील एका स्थानिक रूग्णाच्या मृत्युनंतर तर  दक्षता कमिटीसह  प्रशासन अधिक दक्ष झाले आहे.हलकर्णी येथील एका कर्मचार्यासह शिनोळी येथील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान आज सायंकाळी तहसीलदार विनोद रणवरे यांनी स्वतः पाटणे फाटा, हलकर्णी फाटा येथील बाजारपेठा तात्काळ बंद केल्या.हलकर्णी व पाटणे फाटा येथे सर्वच दुकाने सूरू असलेने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.हलकर्णी फाटा येथील एकाला व बेळगाव सीमेनजिक असलेल्या शिनोळी येथील एका डाॅक्टरलाच कोरोना ने गाठल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खूद तहसिलदार विनोद रणवरे यानी स्वता फाट्यावरील दुकाने बंद केली.आज झालेल्या बैठकीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाययोजनांची अंमलबजावणी
करण्याचा निर्णय घेण्यात आला.


No comments:

Post a Comment