संपादकीय - दौलत कनेक्शनमुळे तालुक्यात कोरोनाचा भडका - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

संपादकीय - दौलत कनेक्शनमुळे तालुक्यात कोरोनाचा भडका

                                              संपादकीय 
 जगभरात कोरोना महामारीने गती घेतली असताना कोल्हापूर जिल्हात आणि विशेषता चंदगड तालुक्यात जून महिन्याच्या शेवट पर्यंत कमी रूग्ण होते. त्यामुळे चंदगड तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असताना अडकूर गावात कोरोनाचा अचानक स्फोट झाला. एका रूग्णाच्या मृत्यसह सोळा जण पॉझिटीव्ह झाले. मात्र शासकीय यंत्रणा आरोग्य विभाग गावच्या दक्षता कमिटी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठा प्रादुर्भाव रोखण्यार यश मिळाले. त्या पुर्वी एप्रिल मे महिन्यात तालुक्यात शासकीय यंत्रणा व ग्राम दक्षता समित्या सक्षम झाल्यामुळे हे शक्य झाले. मात्र जून महिन्यानंतर मोठया प्रमाणात सगळीकडे शिथिलता आली. बाहेरच्या जिल्ह्यातील येणाऱ्या लोकामुळे थोडासा  प्रादुर्भाव जाणवला. मात्र तो कमी झाला. 
   तालुक्यातील दैनदिन व्यवहार सुरू झाले.अनेकजण विना मास्क दुचाकी वरून दोन ऐवजी तीन तर चार चाकीमधून क्षमतेपेक्षा जास्त फिरू लागले. शिनोळ औद्योगिक वसाहती मधील कारखाने तसेच दौलत साखर कारखाना सुरू झाले. दौलत सुरू करताना कारखाना प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे होते. कामगारांना कोरोना संदर्भात आवश्यक त्या सूचना देणं गरजेचं होते.परंतु या संदर्भात प्रशासन   व कामगाराकडून कांही नियम व अटी पाळल्या गेल्या नाहीत. कामगार दुचाकी वरून दोन ऐवजी तीन जण येजा करीत होते. सामाजिक अंतर पाळले जात नव्हते योग्य ती दक्षता घेतली जात नव्हती.हलकर्णी गावातील एका कामगाराला कोरोना लागण झाली आणि त्यानंतर गंभीर दखल घेऊन शोध घेवून कारखाना कांही दिवसासाठी बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु कांहीच घडले नाही या अविर्भावात सर्वजण होते. याच वेळी कारखाना दुरूस्तीसाठी बाहेरचा एक इंजिनिअर आला होता तो कोरोना बाधित होता. त्याचे संपर्कात अनेक कामगार आले अशी चर्चा आहे. तर एका कामगाराचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा झाला. त्यावेळी भोजन पार्टी साठी ही अनेक कामगारांनी तेथे उपस्थिती लावली असल्यामुळे तेथूनही लागण होण्याची शक्यता आहे, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. याचे खरे कारण काय हे स्पष्ट झाले पाहिजे. या घटनेनंतर चार दिवसात मोठा स्फोट झाला. तांबुळवाडी गावासह तीन गावातील पाच कामगार बाधित झाले. येथूनच समुह संसर्गाला सुरूवात झाली. यावेळी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अलगीकरण करणे आवश्यक होते. परंतु येथेही दुर्लक्ष झाले. कामगारांच्या घरामध्ये समुह संसर्गाला मोठया प्रमाणावर सुरूवात झाली. तांबुळवाडी मध्ये एका घरात १६ जण तर गावात ३२ जण लक्कीकट्टे व भोगोली येथें अनुक्रमे ९ व ५ जण एकाच घरात बाधित निघाले. दर दिवसाला संख्या वाढली जात होती. शनिवारी तर कहरच झाला. यादिवसी ३८ तर रविवारी २५ जणांचा पाॅझीटीव्ह अहवाल आले असून १०० अहवाल येणे बाकी आहेत. पाॅझीटीव रूग्णांचे घरातील व संपर्कातील लोकांची यादी वाढत जाणार आहे.  दौलत मध्येच चंदगड तालुक्यातील बहुसंख्य गावामधील दोन चार जण कामगार आहेत. आता पर्यत ३८ गावात कोरोना पोहचला असून येत्या चार दिवसात संख्या मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सध्या चंदगड तालुका स्थानिक रुग्णच्या आकडेवारीत  कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या स्थानी आला आहे,दुर्दैवाने रूग्ण वाढले तर महाराष्ट्रात उच्चांक होण्याची शक्यता आहे. 
    लाॅकडाउन नंतर दौलत कारखाना सुरू करतेवेळी हलकर्णी ग्रामपंचायतीने लेखी पत्र देवून पुरेशी दक्षता घ्यावी असे कळविले होते. जर कारखाना प्रशासन व कामावर येणाऱ्या कामगारानी सावधानता आणि काळजी घेतली असती तर वेळीच संस्थात्मक किंवा गृह अलगीकरण हा पर्याय स्वीकारला असता तर हे भिषण महामारीचे संकट तालुक्यावर आले नसते. यामध्ये कुचराई करणाऱ्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पुढील पंधरा दिवस तालुक्यामधये कडक लाॅकडाउन करणे गरजेचे असून त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळून निदान आठ दिवस पेट्रोल पंपासह सर्वच व्यवहार तालुक्यात बंद झाले तरच ही कोरोनाची साखळी तोंडणे शक्य होणार आहे. 
                                                                       ..... उदयकुमार देशपांडे.

No comments:

Post a Comment