सर्वेक्षण कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देताना डावीकडून डॉ . सोमजाळ , शेजारी पर्यवेक्षक श्री क्षीरसागर |
अडकूर - सी . एल . वृत्तसेवा
कोरोनाचा वाढता प्रसार रोखायचा असेल तर क्षणिक मोहाला आवर घालून प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले.
अडकूर व अडकूर परिसरात कोरोणा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अडकूर कंन्टेनमेन्ट झोन असल्याने गावातील प्रत्येक कुटुंबाचे रोज सर्वेक्षण चालू आहे . या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना डॉ. सोमजाळ बोलत होते. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक क्षीरसागर, आरोग्य सेविका सौ . नाईक उपस्थित होत्या.
डॉ . सोमजाळ पुढे बोलताना म्हणाले , सध्या देशात कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू आहे . जोरदार पाऊस व थंड हवामान सुद्धा कोरोना प्रसारासाठी अनूकूल आहे . त्यामूळे नागरिकांनी घरीच रहाणे अधिक चांगले आहे . कोणतेही सन ,समारंभ साजरे करण्याचा मोह टाळावा . सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावाच. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळाची घेत ग्रामस्थांनाही मास्क, सोशल डिस्टंसींगचे महत्व पटवून द्यावे. शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास
कोरोनाला हरवणे सोपे असल्याचे डॉ. सोमजाळ यानी सांगितले. यावेळी एस. के. हरेर, एस. के. पाटील, पी. के. पाटील, जयवंत कांबळे, विजय कोले, एम. जी. तुपारे, अनिल पाटील, सारिका टक्केकर, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment