खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथे हत्तींकडून ऊस पिकाचे केलेले नुकसान. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीच्या आगमनाने खा गुडवळे मध्ये शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण.काही महिने टस्कर हत्ती दोडामार्ग येथे गेल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आज अचानकपणे आगमनाने शेतकरी व वन विभाग चिंतते पडले आहेत. हत्तीने आगमन करताच खा. गुडवळे येथील नीलकंठ कृष्णा पाटील यांच्या शेतातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पहाणी करून आलेले चंदगड परिक्षेत्र वनधिकारी ज्ञानेश्वर राक्षे,बी. आर.निकम वनपाल यांनी सांगितले.पिकांची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे ही माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment