बिनविषारी तस्कर सापाला पकडून सदाशिव पाटील याने मुलांच्या हातात दिले.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा |
आज नागपंचमी दिवशी सकाळीच मजरे कारवे येथे सकाळी आठ वाजता एका घरात विषारी मण्यार साप घुसल्याने एकच गोंधळ उडाला. बेळगाव - वैंगुला रस्त्यावर बध्यांची प्रचंड गर्दी झाली. तेवढयात कोणी तरी ढोलगरवाडी सर्पशाळेचे सर्पमित्र प्रा . सदाशिव पाटील यांना बोलावून घेतले. पाचच मिनीटात ते घटनास्थळी उपस्थित झाले. सापाला अलगद पकडून गर्दीतील लहान मुलांच्या हातात देऊन हा बिनविषारी ट्रिकेट ( तस्कर ) असल्याचे सांगितले. आणि मण्यार मण्यार म्हणून ओरडणाऱ्या गर्दीत एकच हशा पिकला.
यंदा ढोलगरवाडी चा नागपंचमी उत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला असला तरी कारवेत जमलेल्या गर्दीचे सर्प प्रबोधन करायला सदाशिव पाटील विसरले नाहीत. नागपंचमी जरी बंद असली तरी आमच्या मजरे कारवे येथे खऱ्या अर्थाने सर्प प्रबोधन अणि शास्त्रीय माहितीने खरी नागपंचमी साजरी झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment