बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्ग करण्याची आमदार राजेश पाटील यांची रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2020

बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्ग करण्याची आमदार राजेश पाटील यांची रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे मागणी

देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊन बेळगाव - चंदगड -सावंतवाडी रेल्वे मार्ग संदर्भात चर्चा करताना आमदार राजेश पाटील.
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा 
             बेळगाव जिल्हाचे खासदार व देशाचे रेल्वे राज्यमंत्री नामदार  सुरेश अंगडी  यांची  चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यानी भेट घेऊन बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट  रेल्वे मार्ग  करण्याची मागणी केली . याबरोबरच चंदगड विधानसभा मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध   प्रश्नावर चर्चा केली. 
        बऱ्याच वर्षापूर्वी बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले होते. सदरचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात रखडलेले आहे . यामुळे हा प्रस्ताव लवकर मार्गी लावावा. त्यामुळे हा रेल्वे मार्ग झाल्यास बेळगाव व चंदगड परिसरातील शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी  खूप महत्वाचा हा मार्ग ठरणार आहे .
तसेच कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, बेळगाव,धारवाड व हुबळी या रेल्वे मार्गाची  मागणी तत्कालीन खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी मांडली होती. याला अनसुरून आपण  या रेल्वे मार्गाला  मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर, बेळगाव, धारवाड व हुबळी ही औद्योगिक केंद्रे  एकमेकांशी जोडली जातील.इथे आधी पासून उद्योगधंदे एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे हा रेल्वे मार्ग झाला तर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
         काही दिवसांपूर्वी दोन्ही राज्याच्या पाठबांधरे विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राकसकोप धरणामुळे होणाऱ्या जमिनीच्या नुकसानी बाबत व तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बैठक पार पडली होती , त्या अनुषंगाने तुडये, मळवी व परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई मिळावी व धरणातील गाळ काढावा अशी मागणीही केली. तसेच तिलारी धरणाच्या तीन रखडलेल्या बंधाऱ्यांच्या संदर्भात बेळगाव येते बेळगावचे  पालकमंत्रीव पाठबांधरे मंत्री नामदार रमेश जारकीहोळी , आमदार अनिल बेनके  व आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर  , महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री नामदार  जयंतराव पाटील,पालकमंत्री नामदार सतेज पाटील , खासदर संजयदादा मंडलिक यांच्या समवेत बेळगाव येथे बैठक लवकर व्हावी अशी मागणीही आमदार राजेश पाटील यानी केली.
तिलारी धरणातील रखडलेले तीन बंधारे लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण व कोल्हापूरचे खासदार संजयदादा मंडलिक मिळून केंद्र सरकारकडे मागणी करावी. व दोन्ही राज्याच्या समन्वयातून ही धरणे पूर्ण करावीत .तसेच धरणाचे पाणी चंदगड मधील सात ते आठ गावांना व मार्कंडेया नदीच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील गावांना मिळावे अशी मागणी  यावेळी बोलताना आमदार पाटील यानी केली. यावर सकारात्मक विचार करुन रेल्वेमार्ग साठी आपण सकारात्मक असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यानी सांगितले.

No comments:

Post a Comment