शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती करावी-तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, डूक्करवाडी येथे येथे शेतकरी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2020

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती करावी-तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, डूक्करवाडी येथे येथे शेतकरी मेळावा

शेतकऱ्यांना  झाडे,आर्सेनिक गोळ्याचे वाटप
डूक्कवाडी (रामपूर)येथे शेतकर्याना झाडे वाटप करताना तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, अध्यक्ष सचिन पाटील सरपंच राजू शिवनगेकर  ,आर व्ही ढेरे,मंडलकृषी अधिकारी गारडे आदी
चंदगड / प्रतिनिधी :---- 
     सध्या बी बियाणे,खते,मजूर याच्या वाढलेल्या किंमती पहाता पारंपारिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पादन मिळत नाही, अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकर्यानी शेती मध्ये झालेल्या नवीन तंत्रज्ञानाचा  उपयोग करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यानी केले.ते डूक्करवाडी (रामपूर) ता चंदगड येथे कृषी विभाग व चंदगड तालुका रासायनिक खते,बी-बियाणे, कीटकनाशक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच राजू शिवनगेकर होते. 
  प्रारंभी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच आप्पाजी वरपे यांच्या हस्ते करण्यात आले.     प्रास्ताविक कृषी सहायक एस डी मुळे यानी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यानी पिक विमा, यांत्रिकी योजना,गोपीनाथ मुंडे आपत्ती योजना,भात लागवड, चारसूत्री,ठिबक सिंचन आदी बाबत माहिती दिली,तर मंडलकृषी अधिकारी एस सी गारडे यानी पिकावरील किडी बाबत उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
    यावेळी चंदगड तालुका रासायनीक खते बी बियाणे विक्रेते संघटनेच्या वतीने  शेतकर्याना काजूची झाडे व कोरोना प्रतिबंधक आर्सेनिक-३० गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय पाटील, विलास नाईक, भिकजी ढेरे,विष्णू देवाण, दत्तूआण्णा वर्पे,नामदेव गावडे,लक्ष्मण मेरे, धाकलू देवाण, यूवराज तूर्केवाडकर,अध्यक्ष सचिन पाटील, विजय कोकीतकर, संजय चिलगोंडे,विजय पाटील, वसंत पाटील, शंकर कोकीतकर, मनोहर पाटील, संदिप कोकरेकर ए बी मुळे,जी आर गव्हाळे आदीसह शेतकरी उपस्थित होते. आभार आर व्ही ढेरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment