मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुमुळे जमीनदोस्त झालेले ऊसाचे पिक. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
तुडयेसह सरोळी, ढेकोळी, हजगोळी, मळवी सुरूते या गावच्या शिवारात वादळी वाऱ्याने सुमारे 900 एकर क्षेत्रातील ऊस पीक वादळी वाऱ्याने आडवे पडले आहे.
दोन दिवसापासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वादळी वाऱ्याचे प्रमाण ही मोठे आहे. यामुळे ऊस पीक मोठ्या प्रमाणात आडवे पडत आहे.
महसूल विभागाने पंचनामा करण्याची मागणी शेतकरयातून होत आहे.
तुडये येथे सुमारे 300 हून अधिक एकर क्षेत्र, सरोळी येथे 200 हून अधिक एकर क्षेत्र, ढेकोळी येथे 300 एकर क्षेत्र, हजगोळी येथे 150 एकर क्षेत्र , मळवी येथे 200 एकर क्षेत्र, सुरूते येथे 150 हून अधिक एकर क्षेत्र ऊस पिक आडवे झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस त्यातच मोठ्या प्रमाणात वादळी वारे येत आहे या वादळाने उस आडवा झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
सरोळी येथे वीजवाहक तारावर कोसळेळी झाडे दूर केल्याचे उपसरपंच गोपाळ नवगिरे यांनी सांगितले. तसेच त्या गावाच्या शिवारातील काजूची झाडेही मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत त्या कृषी विभागानेही या झाडांचा पंचनामा करून मदत करावी अशी मागणी होत आहे.
या नुकसानीचा महसूल विभागासह कृषी विभागाने तातडीने पंचनामा करावा. मुसळधार पाऊस त्यातच मोठ्या प्रमाणात वादळी वारे येत आहे. यामुळे शेकडो एकरातील ऊस पीक आडवे झालेे. यामुळे उसाची वाढ खुंटून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
--गोपाळ देवगिरी उपसरपंच, सरोळी
No comments:
Post a Comment