मणगुत्ती येथील शिवपुतळा हटविण्याच्या घटनेचा लकीकट्टे येथे निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2020

मणगुत्ती येथील शिवपुतळा हटविण्याच्या घटनेचा लकीकट्टे येथे निषेध

मणगुत्ती येथील शिवपुतळा हटविण्याच्या घटनेचा लकीकट्टे येथे निषेध करण्यात आला. 
चंदगड (प्रतिनिधी) 
मणगुत्ती (ता. हुकेरी, जि. बेळगाव) (कर्नाटक) येथे ग्रामस्थांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय परवानगी नसल्याच्या कारणास्तव कर्नाटक प्रशासनाने ग्रामस्थांना  चौथऱ्यावरुन उतरवून घेण्यास भाग पाडले. या घटनेचा लकीकट्टे ता. चंदगड येथील शिवसंघर्ष ग्रुप तसेच चंदगड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सुशांत नौकुडकर व ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच शिवसंघर्ष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवपुतळा उभारणीस मनाई करण्याच्या कर्नाटकी आदेशाची व कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी केली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांचा यावेळी जोरदार घोषणा देत तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड व शिव संघर्ष ग्रुप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. याप्रसंगी लकीकट्टे ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment