वादळी पावसात नुकसान झालेल्या उसाचे त्वरित पंचनामे करून मदत द्या, तुर्केवाडी येथील शेतकऱ्यांची तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2020

वादळी पावसात नुकसान झालेल्या उसाचे त्वरित पंचनामे करून मदत द्या, तुर्केवाडी येथील शेतकऱ्यांची तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई द्या. या मागणीचे निवेदन देताना शेतकरी. 
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : माफगील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि पावसाने शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कष्टाने पिकवलेले पीक नष्ट झाल्याने बळीराजा सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. अशा परिस्तितीत शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून मदत घ्यावी अशी मागणी तुर्केवाडी येथील शेतकऱ्यांनी केली. या मागणीचे निवेदन सोमवारी तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले. निवेदन देताना भरमाणा गावडे, शंकर ओऊळकर, गोपाळ गावडे, मेहबूब शेख, बाळू अडकुरकर, नंदकुमार ओऊळकर उपस्थित होते. निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

तुकेवाडी, तडशिनहाळ, माडवळे , जंगमहट्टी- मरकुटेवाडी, वैतागवाडी या भागात जगमडी मध्यम प्रकल्प धरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. यंदा तरारून आलेल्या उसाला मागील आठवड्यात झालेल्या पावसाने मोठा फटका बसला असून संपूर्ण ऊस जमीनदोस्त झाला आहे. 

वादळ व पाऊसामुळे या भागातील जवळपास वीस टक्के पीकाचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बँड आहेत. त्यामुळे शेतीमालाला उठाव नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहे. त्यात हातातोंडाशी आलेला ऊस भुईसपाट झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. 

मागील वर्षाच्या महापुरातून सावरत यंदा शेतकऱ्यांनी चांगले पीक घेतले होते. ऊसासाठी महागडी खते, हुमणी रोटा, वाळवी अशा रोगापासून ऊस पीक वाचविण करिता शेतकऱ्यांनी सेवा सासायटी, बँका, पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज यावर्षी कसे फेडायचे या चिंतेत बळीराजा हवालदील झालेला आहे. तेव्हा संपूर्ण चंदगड तालुक्यातील ऊस क्षेत्राचे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष ताबडतोब पंचनामे करून मदत करावी अशी मागणी तुर्केवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment