![]() |
संत गजानन पॉलिटेक्निकची इमारत. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
महागांव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पाँलिटेक्निक मध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी सोमवारी (दि.10) पासून प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली यासाठी शासनाकडून अधिकृत सुविधा केद्रं म्हणून मान्यता मिळाली आहे. हि प्रवेशप्रक्रिया 25 ऑगस्ट
अखेर चालणार आहे.
या पॉलिटेक्निकची शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सलग आठ वर्ष अति उत्कुष्ट श्रेणी म्हणून गौरवण्यात आला आहे तसेच यावर्षी नॅशनल बोर्ड ॲक्रिडेटेशन (एन.बी.ए.) कडून सर्वोच्च मानाकंन मिळाला आहे. येथील मेकॅनिकल, सिव्हिल इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आटोमोबाईल व नव्यानेच मंजूरी मिळालेल्या डी. एम. एल. टी. या अभ्यासक्रमासाठी प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.येथे प्रवेशित विद्यार्थाना शासनाच्या सर्व सवलती उपलब्ध आहेत तरी इच्छुक विद्यार्थानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय दाभोळे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 8888868443, 8605009614 या फोन नंबरशी संपर्क साधावा.
10 ते 25 ऑगस्ट ऑनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रे छाननी पडताळणी व अपलोड करणे आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे. 28 ऑगस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. 29 ते 31 ऑगस्ट तात्पुरती गुणवत्ता याद्यामध्ये विद्यार्थाची तक्रार असल्यास तक्रार करणे. 2 सप्टेंबर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे अशी माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment