चंदगड/प्रतिनिधी:--- ताम्रपर्णी नदीला आलेल्या महापूरात वाहून गेलेल्या
नरेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी धोंडीबा धाकलू बोलके (वय 45) यांचा मृतदेह माणगाव येथील लोहारकी नावाच्या शेता जवळ आढळला.
शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी धोंडीबा हे सकाळी साडेसात वाजता शेताकडे जाऊन येतो म्हणून गेले होते मात्र त्या वेळी त्यावेळी नदीला महापूर होता. शेताकडून घरी येतांना महापूराच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. नारेवाडी येथून
सात किलोमीटरवरील माणगाव या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक संतोष साबळे करत आहेत.ते गेल्या तीस वर्षापासून नरेवाडी येथे घर जावई म्हणून रहिवासी आहेत. ते ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सासू असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment