कोवाड (वार्ताहर)
केंद्र शाळा कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत पहिली ऑनलाईन शैक्षणिक परिषद नुकतीच पार पडली. ऑनलाइन पार पडलेली पहिली परिषद असूनही केंद्रातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यात दहा प्राथमिक, आठ माध्यमिक, दोन इंग्लिश मीडियम व एक आश्रम शाळा अशा एकूण २१ शाळांतील शिक्षकांनी सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेत परिषद यशस्वी केली.
केंद्रप्रमुख डी आय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किणी शाळेचे अध्यापक विलास पाटील यांनी परिषदेचे संचालन केले. दोन तास चाललेल्या परिषदेत श्रीराम विद्यालय कोवाड चे मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी मुलांची कलचाचणी घेण्यामागील शासनाची भूमिका, तेऊरवाडी शाळेचे अध्यापक आनंदा द. पाटील यांनी दिव्यांग मुलांचे शिक्षण, मलतवाडी शाळेच्या अध्यापिका प्रमिला कुंभार यांनी इंग्रजी अध्यापन, किणी शाळेचे अध्यापक ए के पाटील यांनी सगुन शाळा व आप्पाराव पाटील यांनी दीक्षा ॲप वापर या विषयांवर मार्गदर्शन केले.
केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील, सुधीर मुतकेकर, प्रेमिला बामणे, मनोहर खादरवाडकर, पी. जे दियास, एस. एन. पाटील आदी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. बळवंत लोंढे यांनी आभार मानले. केंद्रातील काही गावांतून इंटरनेट सुविधा चांगली नसल्यामुळे काही शिक्षकांना यापासून वंचित रहावे लागले.
No comments:
Post a Comment