चंदगड तालुक्यात क़रोनाच्या लढ्यात सर्वांचे सहकार्य; चंदगडला मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल उभारणार - यड्रावकर-पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2020

चंदगड तालुक्यात क़रोनाच्या लढ्यात सर्वांचे सहकार्य; चंदगडला मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल उभारणार - यड्रावकर-पाटील

चंदगड येथे रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम.
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
        कोरोना विरुद्धचा लढ्यात आरोग्य, महसूल, पोलीस आशा वर्कर, सेविका यांनी मोठे योगदान दिले आहे.  सर्व जनतेने  नियमांचे पालन करत  कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्याचा रेषो कमी राहिला आहे असे प्रतिपादन आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.
            एकवेळ जिल्ह्यात चंदगड मध्ये जास्त रुण्ग वाढण्याची भीती वाटत होती. पण आज जिल्ह्यात कमी रुग्ण या तालुक्यात असल्याचे समाधान आहे. तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनी स्वताच्या आमदार फंडातून चंदगड साठी रूग्ण वाहीका उपलब्ध करुन दिल्याने आनंद आहे मात्र रुग्ण वाढू नयेत ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवा चांगली मिळाली यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करेण असे   मंत्री राजेंद्र पाटील--यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील महसूल विभागाच्या काँन्फरन्स हाँल मध्ये सुरक्षित अंतर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विषयक आढावा बैठकीत ते  बोलत होते.
                  सुरुवातीला प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी जिल्ह्यातील शेवटच्या या तालुक्यात सुविधांंचा अभाव असताना सुध्दा उपलब्ध साधनसामग्री व मोठ्या आत्मविश्वासाच्या जोरावर आरोग्य, महसूल, पोलीस तसेच सर्वच कर्मचारी आशा वर्कर, सेवीका, व महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या सहकार्य मुळे कोरोनाच्या संकटा विरुद्ध लढा देता येत आहे. तालुक्यात अध्यावत हाँस्पीटलची उनिव आहे असे स्पष्ट केले. 
 तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.के.खोत यांनी तालुक्यातील कोरोना बाबत चा सर्व आढावा सांगुन केल्या जात असलेल्या उपचार, उपांंची सविस्तर माहिती सांगीतली. त्यानंतर आम.राजेश पाटील यांच्या हस्ते आरोग्य राज्य मंत्री यड्रावकर-पाटील, खा.संजय मंडलिक,जि.प.उपाध्यक्ष पाटील   यांचा 
 जि.प.चे उपाध्यक्ष पाटील तसेच शिवसेना जिल्हा अध्यक्ष विजय देवणे, विधानसभा संघटक संग्राम कुपेकर यांचे स्वागत करण्यात आले.
              खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील आरोग्य विषयक सुविधा साठी खासदार या नात्याने मी सर्वोतोपरी प्रयत्न करत राहील.चंदगड तालुक्यातील ट्रामा सेंटरसाठी लवकरच सर्वांच्या सहकार्यांने प्रयत्न करु असे सांगितले.
                तर आमदार राजेश पाटील यांनी आमदार फंडातून चंदगड व गडहिंग्लज आजरा साठी रूग्ण वाहीका उपलब्ध करून दिल्या  आहेत. तालुक्यातील इतर आरोग्य विषयक सेवा-सुविधा बाबत आमचे महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे. असे सांगुन शासकीय यंत्रणेचे कौतुक केले.
               या कार्यक्रम दरम्यान चंदगड अर्बन बँक,रवळनाथ पत संस्था यांच्या वतीने चंदगड कोरोना सेंटरसाठी पाच व्हेंटिलेटर देत असल्याचे रवळनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक भिंगुर्डे यांनी सांगितले.चंदगडचे  माजी सरपंच आण्णापा हुंबरवाडी, माजी जि. प. सदस्य भरमाणा गावडा, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, प्रविण वाटंगी यांनी सुचना मांडल्या. सुत्र संचलन संजय राजगोळकर यांनी केले  तर आभार तहसीलदार विनोद रणवरे यांनी मानले.तालुक्यातील आरोग्य विभागाकडून कोरोना बाबत  केल्या जाणाऱ्या प्रयत्नासाठी प्रातिनिधीक स्वरूपात तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. खोत व डॉ. एस.एस.साने यांचा सत्कार मंत्री यड्रावकर-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  या कार्यक्रमाला जि प सदस्य अरूण सूतार,तानाजी गडकरी, पं.स.सदस्य दयानंद काणेकर, सभापती अँड अनंत कांबळे, नगराध्यक्ष सौ.प्राची दयानंद कानेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,शांता जाधव, राष्ट्रवादी तसेच  शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment