![]() |
राजीव गांधी |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील नगरपंचायतीवर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांची ७६ वी जयंती साजरी करण्यात आली. त्याच्या प्रतिमेचे पूजन चंदगड नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र परीट, चंदगड अर्बन बॅंकेचे संचालक व पं स.सदस्य दयानंद काणेकर, नगरसेवक व बांधकाम सभापती अभिजित गुरबे, नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, बाळासाहेब हळदणकर, जाकीर नाईक, मेहताब नाईक, रोहीत वाटंगी, नगरसेविका नेत्रदिप कांबळे, अनिता परीट, माधुरी कुंभार, अनुसया दाणी, मुमताज बी मदार, मुख्याधिकारी अभिजीत जगताप, प्रशासन अधिकारी सचिन शिंदे, नगर अभियंता ऋषिकेश साबळे, अशोक दाणी, करीम मदार व इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment