राजीव गांधींच्या ७६ वी जयंतीनिमित्त आजरा येथे वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2020

राजीव गांधींच्या ७६ वी जयंतीनिमित्त आजरा येथे वृक्षारोपण

राजीव गांधींच्या ७६ वी जयंतीवेळी उपस्थित विष्णुपंत केसरकर,सतेज टीमचे रवींद्र भाटले.
चंदगड / प्रतिनिधी
राजीव गांधींच्या ७६ वी जयंतीनिमित्त आजरा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन तालुक्याचे ज्येष्ठ नेते विष्णूपंत केसरकर यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यानिमित्त उर्दु हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संजयभाऊ सावंत, टीम सतेजचे प्रमुख रविंद्र भाटले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नौशाद बुड्डेखान, याह्याखान बुड्डेखान, रोहीत नार्वेकर, अलाउद्दीन खेडेकर, गौस तकीलदार यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment