चंदगड तालुक्यात पावसाची उसंत, चंदगड-बेळगाव खुला, पुरस्थिती जैसे थे, पडझडीने लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

चंदगड तालुक्यात पावसाची उसंत, चंदगड-बेळगाव खुला, पुरस्थिती जैसे थे, पडझडीने लाखोंचे नुकसान

चंदगड-हेरे मार्गावर चंदगड पुलावर पुराचे पाणी आल्याने दुसऱ्या दिवशीही वाहतुक ठप्प आहे.
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
       गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीही दाटे वगळता अन्य मार्ग बंद आहेत. अनेक बंधारे तिसऱ्या दिवशीही पाणीखालीच असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासा चंदगड तालुक्यात 278 मिलीमीटर तर सरासरी 46 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील एकूण पाऊस ११४७५ तर सरासरी पाऊस १९१२ मिलिमीटर इतका झाला आहे.
              मंडलनिहाय पाऊस कंसात जूनपासूनचा पाऊस
मंगळवार सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे चंदगड  ५५(२३१४), नागणवाडी ४४ (१९५२),  माणगाव २६ (९२०), कोवाड २४ (९३८),  तुर्केवाडी ४२ (१९८०), हेरे ८७(३३७१), चोवीस तासातील एकूण पाऊस २७८ तर सरासरी पाऊस ४६ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यात आज अखेर हेरे मंडलात सर्वाधिक सर्वाधिक पाऊस झाला आहे. 
                 अतिवृष्टीने पडझड होवून झालेले नुकसान
1) मजरे शिरगाव येथील सुशिला रामू मुळीक यांच्या घराचे भिंत पडून 15000 हजाराचे नुकसान झाले आहे. 2) मुकुंद तुकाराम नाईक रा हलकर्णी याचे घराची भिंत पडून 80000/-रु चे नुकसान 3) मौजे माणगाव येथील शिवाजी सुबराव नरी यांचे घराचे भिंत पडून 15 000 रु चे नुकसान झाले 4) बाळू यमाजी अर्जुनवाडकर यांचे भिंत पडून 10 000 चे नुकसान झाले. 5) मौजे लाकुरवाडी येथील तातोबा कृष्णा रेडेकर यांच्या घराची भिंत पडून 10000 चे नुकसान झाले. 6) रामू चुडापा राजगोळकर यांचे घराचे भिंत पडून 5000 चे नुकसान. 7) तुकाराम सिद्धापा रेडेकर यांचे घराची भिंत पडून 15000 चे नुकसान झाले. 8) मौजे निटूर येथील विजय जोतिबा पाटील घराची भिंत पडून 7000 नुकसान. 9) निटूर येथील मनोहर गोपाळ पाटील घराची भिंत पडून 70000 नुकसान. 10) निटूर येथील शिवाजी दुर्गप्पा मर्नहोळकर घराची भिंत पडून 65000 नुकसान.  11) निटूर येथील ओमाना कल्लापा सुतार पूर्ण घर पडून 150000 नुकसान 12) आमरोळी येथिल पुंडलिक देमाना मोरे घराची भिंत पडून 20000 नुकसान 13) राजगोळी बु येथील तानाजी निंगापा गुरव घराची भिंत पडून 50000 नुकसान 14) ढोलगरवाडी येथील रुक्मिणी विठोबा पाटील घराची भिंत पडून 30000 नुकसान 15) तुडिये येथील कल्लापा निंगापा पाटील घराची भिंत पडून 40000 नुकसान झाले आहे. आतापर्यंतचे हे सर्वांधिक नुकसान आहे. 


No comments:

Post a Comment