दुंडगे - कुदनुर मार्गावरील पुल बांधा, अन्यथा आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

दुंडगे - कुदनुर मार्गावरील पुल बांधा, अन्यथा आंदोलन

दुंडगे येथील कोल्हापूर पद्धतीचा बांधण्यात आलेला बंधारा
चंदगड / सी एल वृत्तसेवा 
     चंदगड तालुक्यातील दुंडगे - कुदनुर मार्गावर असलेल्या ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावरील पुलाचे बांधकाम कोवाड येथील पुलाप्रमाणे करावे अन्यता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रकल्पदाता प्रकल्प समितीचे अध्यक्ष व शेकापचे विजयभाई पाटील यांनी दिला आहे.                                
      दुंडगे - कुदनुर मार्गावरील ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असलेला कुदनूर येथील अनिल बळवंत बामणे हा  तरूण मोटारसायकल सह बंधाऱ्यात पडल्याने त्याचा म्रुत्यु झाला. या बंधाऱ्याची लांबी,रूंदी व खोली व जुणे झालेले बांधकाम या बाबींचा विचार केला तर सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक आहे.या मार्गावर जा-ये करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. आता घडलेली घटना व यापूर्वी च्या घटनांचा विचार करून संमधीत  बांधकाम विभागाने या ठिकाणी कोवाड येथे ताम्रपर्णी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाप्रमाणे बांधकाम करावे अन्यथा प्रकल्पदाता प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष व शेकापचे विजयभाई पाटील यांनी आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. 

No comments:

Post a Comment