कोवाडमध्ये होत असलेले अतिक्रमण थांबवण्याचे निवेदन चंदगडचे नायब तहसिलदार संजय राजगोळे याना देताना कोवाड ग्रामस्थ |
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदिघाटावर दुकान गाळे बांधण्याचा लिलाव करण्यात आला आहे . याबरोबरच बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या बाजूना टपऱ्या ,हातगाडे लावण्याची परवानगी ग्रामपंचायत देत आहे. त्यामूळे नदिघाटावरील दुकान गाळ्यांचा लिलाव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन कोवाडच्या ग्रामस्थांनी चंदगड चे नायब तहसिलदार संजय राजगोळे याना दिले.
कोवाड बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला टपरी , हातगाडे लावण्यास परवानगी दिल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते . तसेच नविन पुलाच्या पूर्वेला व पश्चिमेला नादिकाठावरच दुकान गाळ्यांचा लिलाव केला आहे. त्यामूळे अगोदरच नदिक्षेत्रात अतिक्रम असणाऱ्या कोवाड़मध्ये पुन्हा अतिक्रमण झाल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो . त्यामूळे हि सर्व अतिक्रमणे थांबविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर विजय सोनार, शिवाजी महागावकर, राणबा पाटील, ओमकार सोनार आदिंच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment