उचंगी येथे गव्याचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

उचंगी येथे गव्याचा मृत्यू

आजरा / प्रतिनिधी 
        उचंगी (ता. आजरा) येथे मादी गव्याचा मृत्यू झाला आहे .याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी उचंगी येथील वनविभागाच्या कक्ष 245 व स्थानिक शेतकऱ्यांचा गट नं 165 या परिसरात एक गवा जखमी अवस्थेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दिसला .मात्र एका तासातच या गव्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून या संदर्भात माहिती दिली.  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डि. ढेकळे यांनी गव्याचे शवविच्छेदन केले असता पोटात पाच महिन्याचे पिल्लू आढळून आले. पोलीस पाटील,डॉ पी डी ढेकळे,वनपाल डी. बी. काटकर,वरक्षक सुरेखा चाळके यांच्या उपस्थितीत पंचनामा करून गव्याला दफन करण्यात आले. मात्र या मादी गव्याला विजेचा शॉक लागल्याची चर्चा गावसह पंचक्रोशीत सुरु आहे.


No comments:

Post a Comment