आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश , काजू उत्पादक व कारखानदारांना मिळणार लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश , काजू उत्पादक व कारखानदारांना मिळणार लाभ

आमदार राजेश पाटील
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
        जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे व्हीसी द्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई , फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांच्या सोबत चंदगडचे आमदार राजेश पाटील यानी मतदारसंघातील काजू प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली . यामध्ये येथील काजू उत्पादक व कारखानदार यांना शासनाकडून ठोस मदत देणार असल्याचे आश्वासन मंत्रालयाकडून देण्यात आले . यामूळे चंदगड , आजरा व जवळच्या खानापूर तालूक्यातील काजूचा प्रश्न आमदार राजेश पाटील यांच्यामूळे मार्गी लागत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे .
         या व्हीसी मिटींगमध्ये चंदगडहून  बळीराजा शेतकरी संघटनेने अध्यक्ष नितीन पाटील , प्रा .दिपक पाटील सुद्धा सहभागी झाले होते . चंदगड तालुक्यातील काजू उत्पादन व समस्या संदर्भात आमदार राजेश पाटील यानी उपमुख्यमंत्री अजित पवार याना सविस्तर पत्र लिहून मिटींग बोलविण्याची मागणी केली होती . यानुसार संबधीत विभागाचे अधिकारी व मंत्री यांच्या सोबत व्हीसी मिटींग झाली . यामध्ये काजू प्रक्रिया उद्योगांच्या जीएसटी परताव्याचा निर्णय झाला . खेळत्या भांडवलावरील ५ % व्याज  रिबेटवर चर्चा झाली .आमदार पाटील यानी शेतकऱ्यांच्या काजूला हमीभाव मिळावा , पणन च्या माध्यमातून काजू साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान ( भांडवल ) उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली . यावेळी या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी सांगीतले. एकंदरीत आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून चंदगड मतदार संघातील काजू उत्पादक शेतकरी व कारखानदार यांचा प्रश्न मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.



No comments:

Post a Comment